सिव्हिल सर्व्हिसेसमधील एका महिला अधिकारी प्रचंड खजिन्याची मालक असल्याचे उघड झाले आहे. नुपूर बोरा ही 2019 च्या बॅचची सिव्हिल सर्व्हिसेस (एसीएस) अधिकारी आहे. तिने आतापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे.
सरकारी अधिकारी का बनायचं आहे ? असा प्रश्न विचारल्यावर, देशाची सेवा करायची आहे असं सरधोपट उत्तर नेहमी दिलं जातं. सरकारी अधिकाऱ्यांच्या, विशेषतः नागरी सेवांच्या मुलाखतींमध्ये हा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि हेच उत्तर थोड्याबहुत फरकाने मिळतं. पण खरोखर किती अधिकारी ते (सेवा) करू शकतात, करून दाखवतात ? सध्या समोर येणाऱ्या बातम्या पाहिल्य तर किती सरकारी अधीकारी हे देशाची सेवा करतात आणि किती जण पैसे कमावण्यात व्यस्त असतात, हे सहज दिसू शकेल.
रेट कार्डही ठरलं होतं
शिवसागरचे आमदार अखिल गोगोई यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक कार्यकर्ते गट कृषक मुक्ती संग्राम समिती (KMSS) यांनी अधिकारी नुपूरविरोधात औपचारिक तक्रार दाखल केली. तिने जमिनीशी संबंधित विविध सेवांसाठी तपशीलवार “रेट कार्ड” ठेवले होते असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे . तक्रारीनुसार, जमिनीच्या नकाशासाठी 1,500 रुपयांपासू ते जमिनीच्या नोंदींमध्ये नाव जोडण्यासाठी किंवा वगळण्यासाठी 2 लाख रुपयांर्यंत लाचेची रक्कम होती.
आणखी अनेक गुपितं
नुपूरचे घर आणि इतर ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्याचे नेतृत्व करणाऱ्या सीएम व्हिजिलन्सच्या एसपी रोझी कलिता यांनी या कबुली दिली की नुपूरवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. तिच्या घरून व इतर ठिकाणांहून केलेली रोकड आणि दागिने ही प्राथमिक कारवाईचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे आणि पुरावे हाती येऊ शकतात असेही त्या म्हणाल्या.